
आश्विन महिन्यातील सकाळ किंवा आला आश्विन मास! निबंध मराठी
आश्विन महिन्यातील सकाळ ही काही वेगळीच असते. आश्विन महिन्याच्या सकाळी सारे वातावरण कसे प्रसन्न असते ! आकाश निरभ्र असते. वातावरणात गारवा जाणवतो. सकाळच्या सोनेरी किरणांनी आसमंत उजळून निघालेला असतो. अशा या सोनेरी सकाळी जाग आल्यावर अत्यंत प्रसन्न वाटते.
धुक्याची मऊ दुलई हलकेहलके दूर सारून आश्विनातील सकाळ जागी होत असते. तृणपर्णांवर दवाचे थेंब तेजस्वी मोत्यांप्रमाणे चमचमतात. सूर्यनारायणाचे कोवळे किरण चराचर सृष्टीला सोनेरी केशराचा साज चढवतात.
आश्विनाच्या पहिल्या दिवसापासूनच नवरात्रोत्सव सुरू होतो. घरातील मंडळी लवकर उठून घराची साफसफाई करून देवतांच्या स्वागताची तयारी करतात. नऊ रात्री, नऊ दिवस देव आपल्या घरात राहणार अशी भाविकांची श्रद्धा असते. गावातील सारी देवळे आश्विनाच्या आगमनाच्या आधीच नटूनथटून त्याच्या स्वागताला सिद्ध असतात. भल्या पहाटे भवानीमातेच्या देवळातील सनई-चौघडा वाजू लागतो. तो मंगलमय नाद साऱ्या आसमंतात पसरतो. भाविक लोक शुचिर्भूत होऊन झेंडूच्या सोनेरी-केशरी माळा घेऊन मंदिराच्या दिशेने लगबगीने जाताना दिसतात.
आश्विनाच्या नऊ रात्रीच्या उत्सवानंतर उगवणाऱ्या दसऱ्याचे स्वागत मोठ्या प्रेमाने होते. दसऱ्याच्या संध्याकाळी सोने लुटण्यात आबाल-वृद्ध दंग होतात.
आश्विन महिन्याच्या अखेरीस भल्या पहाटे उठून लोक उटणी लावून अभ्यंगस्नान करतात. फटाक्यांच्या आवाजाने सारे वातावरण दुमदुमते. या मंगलप्रभाती साऱ्यांची मने आनंदाने फुलून आलेली असतात; कारण आश्विनातील ती सकाळ दिवाळीच्या आगमनाची शुभवार्ता देत असते.
पुढे वाचा:
- आराम हराम आहे निबंध मराठी
- आरसा निर्माण झाला नसता तर निबंध मराठी
- आम्ही गाव स्वच्छ करतो तेव्हा निबंध मराठी
- आमच्या शाळेतील ग्रंथालय निबंध मराठी
- आमच्या गावची जत्रा मराठी निबंध
- आमच्या गावचा बाजार निबंध मराठी
- आमचे पशुमित्र निबंध मराठी
- आपले सामाजिक कर्तव्य निबंध मराठी
- आपले शेजारी देश निबंध मराठी
- (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन माहिती
- माझा देश निबंध मराठी
- स्वातंत्र्य दिन मराठी निबंध
- आदर्श विद्यार्थी मराठी निबंध
- आदर्श नागरिक मराठी निबंध
- आत्महत्या सुटकेचा अनैतिक मार्ग निबंध मराठी
- आणि झाडे गप्प झाली निबंध मराठी
- आठवड्यामध्ये रविवार नसता तर निबंध मराठी
- आजकालचे लग्नसमारंभ निबंध मराठी
- आकाश दर्शन निबंध मराठी