
अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम् निबंध मराठी – AlassyaKuto Vidya Avidyasya Kuto Dhanam
आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळसामुळे कोणतेही कार्य नीट करता येत नाही, ज्ञानप्राप्ती होत नाही. आळशी माणसाला विद्या संपादन करता येत नाही. विद्या नसलेला माणूस धन मिळवू शकत नाही. ‘आळसाने विद्या जाते आणि विद्या नसेल तर धनही जाते’ असा या उक्तीचा अर्थ आहे.
अंगात सतत आळस असणाऱ्या माणसाला कुंभकर्ण’ म्हणतात. माणसाला मिळालेले जीवन हे दैवी देणगी आहे. जीवनाचे सार्थक करणे आणि जीवनरुपी मिळालेल्या संधीचे सोने करणे हे केवळ माणसाच्याच हातात आहे. ‘विद्या’ हे जगातील सर्वश्रेष्ठ धन आहे. ते कितीही दिले तरी संपत नाही, उलट वाढतच राहते. अंधकारमय जीवन उजळण्यासाठी विद्येच्या उपासनेची गरज असते; पण ही विद्या जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि एकाग्रतेशिवाय कशी मिळणार? आळशी माणूस ‘दे हरी पलंगावरी’ या विचाराचा असतो. तो विद्या आणि धन मिळवू शकत नाही. .
भारताचे पहिले पंतप्रधान नेहमी म्हणत ‘आराम हराम है ।’ निष्क्रियता आणि आळस हे विद्या आणि धन प्राप्तीच्या मार्गातील मोठे अडथळे आहेत. ‘आळसे कार्यभाग बुडतो’ हे लक्षात ठेवून उत्साहाने, आनंदाने जिद्दीने कार्यास लागल्यास लक्ष्मी आणि सरस्वती घरात पाणी भरतील.
पुढे वाचा:
- आराम हराम आहे निबंध मराठी
- आरसा निर्माण झाला नसता तर निबंध मराठी
- आम्ही गाव स्वच्छ करतो तेव्हा निबंध मराठी
- आमच्या शाळेतील ग्रंथालय निबंध मराठी
- आमच्या गावची जत्रा मराठी निबंध
- आमच्या गावचा बाजार निबंध मराठी
- आमचे पशुमित्र निबंध मराठी
- आपले सामाजिक कर्तव्य निबंध मराठी
- आपले शेजारी देश निबंध मराठी
- (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन माहिती
- माझा देश निबंध मराठी
- स्वातंत्र्य दिन मराठी निबंध
- आदर्श विद्यार्थी मराठी निबंध
- आदर्श नागरिक मराठी निबंध
- आत्महत्या सुटकेचा अनैतिक मार्ग निबंध मराठी
- आणि झाडे गप्प झाली निबंध मराठी
- आठवड्यामध्ये रविवार नसता तर निबंध मराठी
- आजकालचे लग्नसमारंभ निबंध मराठी
- आकाश दर्शन निबंध मराठी