आकाश दर्शन निबंध मराठी-Akash Darshan Nibandh in Marathi
आकाश दर्शन निबंध मराठी-Akash Darshan Nibandh in Marathi

आकाश दर्शन निबंध मराठी – Akash Darshan Nibandh in Marathi

शाळेतून हल्लीच आम्हाला नेहरू तारांगण येथे शैक्षणिक सहलीसाठी नेण्यात आले होते. त्या वेळेस तिथे आम्ही आकाशदर्शनाचे जे कार्यक्रम पाहिले त्यामुळे माझी मतीच गुंग झाली. पुस्तकात वाचून जे आम्हाला समजले नसते ते आम्हाला तिथे प्रत्यक्ष पाहायला मिळाले.

खरोखरच खगोलशास्त्राबद्दलचा एक सुखद अनुभव आम्हाला तिथे मिळाला. तिथे सूर्यमालेवर एक कार्यक्रम होता. तो पाहायला बसलो तेव्हा मला खूपच गंमत वाटली. आकाशाच्या गोल घुमटासारखा बांधलेला तिथला रंगमंच आगळावेगळाच आहे. खुर्त्या पूर्ण मागे सरकवून आडव्या करण्याची सोय असल्यामुळे जवळ जवळ आडवेच होऊन त्या घुमटाकृती रंगमंचावर चाललेली अद्भुत दृश्ये पाहाता येतात. सगळीकडे संपूर्ण अंधार असतो. त्यामुळे भर दुपारी देखील आपण रात्रीचे आकाश पाहू शकतो.

आपली सूर्यमाला, ग्रह, सप्तर्षांचा तारकासमूह आणि आकाशगंगा पाहून मी चकीतच झालो. नंतर हेलेच्या धुमकेतूवरचा माहितीपटही पाहिला. दर ७५-७६ वर्षांनी दिसणारा हा धुमकेतू १९८६ साली दिसला होता. ह्यापुढे तो २०६१ साली दिसेल. ते पाहून मला खगोलशास्त्र एवढे मनोरंजक वाटले म्हणून सांगू? असं वाटलं की मोठेपणी आपण खगोलशास्त्र ह्याच विषयाचा सखोल अभ्यास करावा आणि कल्पना चावलासारखं अंतराळवीर व्हावे.

त्यानंतर मी माझ्या बाबांजवळ हट्ट धरला आणि आम्ही वांगणी येथे प्रत्यक्ष आकाशदर्शनाला गेलो. तिथे रात्रीच्या वेळेस मोठ्या पटांगणावर दुर्बिणी घेऊन सर्व जण बसतात आणि आकाशातील तारकादळे पाहातात. मला स्वतःला शनीभोवती असलेली कडी आणि गुरूचे बारा चंद्र पाहाण्याची खूप इच्छा होती. ती माझी इच्छा तिथे पूर्ण झाली म्हणून मला खूपच आनंद झाला. त्याशिवाय आम्ही ध्रुव तारा, सप्तर्षी आणि कृत्तिका हे तारकासमूहसुद्धा पाहिले. पूर्वीच्या काळी समुद्रावर गलबते घेऊन जाणा-या झुंजार खलाश्यांना ध्रुवाचा तारा हाच एकमेव दिशा दाखवणारा तारा होता ते पाहून अगदी नवलच वाटले.

आकाशदर्शनासाठी आकाश निरभ्र लागते. तसेच विजेच्या दिव्यांचा उजेड नसला पाहिजे. तरच आपण ते पाहू शकतो. परंतु हल्ली सगळीकडे शहरीकरण होऊ लागल्यामुळे मोकळी पटांगणे आणि प्रदूषणविरहित निरभ्र आकाश बघणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.

आकाश दर्शन निबंध मराठी-Akash Darshan Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply