Aamchi Mumbai Essay in Marathi : मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी देखील आहे. मुंबईला पूर्वी बॉम्बे म्हणत. प्रिन्स ऑफ वेड्स म्युझियम (छत्रपती शिवाजी वास्तुसंग्रहालय), गेटवे ऑफ इंडिया, जुहू बीच, मरीन ड्राइव्ह, मार्वे आणि चौपाटी हे मुंबई शहरातील काही लोकप्रिय ठिकाणे आहेत.

आमची मुंबई मराठी निबंध लिहिताना तुम्ही मुंबईचे भौगोलिक स्थान, प्रसिद्ध खाद्यपदार्थ, प्रसिद्ध ठिकाणे, प्रसिद्ध सण, त्याचे राजकीय/आर्थिक महत्त्व इत्यादी मुद्दे समाविष्ट करू शकता. त्यानंतर, तुम्हाला मुंबई शहर का आवडते याची कारणे तुम्ही स्वतः स्पष्ट करू शकता.

आमची मुंबई
आमची मुंबई

आमची मुंबई मराठी निबंध – Aamchi Mumbai Essay in Marathi

आमची मुंबई मराठी निबंध – Aamchi Mumbai Essay in Marathi Set 1

[मुद्दे : मुंबई ही मोहमयी नगरी – देशोदेशींचे लोक येथे येतात सात बेटांनी बनलेले शहर – वाहतुकीची विपुल साधने – मनोरंजनाच्या सोयी – उदयोगव्यवसाय – भारताचे छोटे रूप.]

मुंबई ही एक जागतिक कीर्ती लाभलेली मोहमयी नगरी आहे. संपूर्ण जगातून असंख्य लोक मुंबईत येतात. म्हणून आता ही मुंबई नाना त-हेच्या लोकांनी फुलून गेली आहे.

मुंबई ही आमच्या महाराष्ट्राची राजधानी आहे. मुळात हे शहर सात बेटे जोडून निर्माण झाले आहे. मुंबई हे अत्यंत सोयीस्कर बंदर आहे. येथे विस्तीर्ण रस्ते व अनेक महाकाय उड्डाणपूल आहेत. रेल्वे, बसगाड्या, टॅक्सी, रिक्षा अशी वाहतुकीची अनेक साधने येथे आहेत. येथील रस्त्यांवरून रोज हजारो वाहने धावतात.

मुंबईत उत्तमोत्तम शाळा-महाविदयालये आहेत. उत्तमोत्तम चित्रपटगृहे व नाट्यगृहे आहेत. सुंदर सुंदर बागबगिचे आहेत. जिजामाता उदयान हे सर्वांचे आवडते प्राणिसंग्रहालय येथेच आहे. सुप्रसिद्ध ‘संजय गांधी राष्ट्रीय उदयान’ही येथेच आहे.

मुंबईत अनेक कारखाने आहेत. येथे अनेक उदयोग-व्यवसाय चालतात. काम करणाऱ्या कोणालाही येथे पोट भरता येते. त्यामुळे सगळीकडून लोक येथे येतात. येथे सर्व जातिधर्मांचे, विविध भाषा बोलणारे लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळे संपूर्ण भारताचे दर्शन येथे घडते. म्हणूनच मला मुंबई खूप आवडते.

आमची मुंबई मराठी निबंध-Aamchi Mumbai Essay in Marathi
आमची मुंबई मराठी निबंध, Aamchi Mumbai Essay in Marathi

मुंबई एक मायानगरी निबंध – My Mumbai Essay in Marathi Set 2

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथील व्यापारात आणि भांडवली बाजारात कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. त्याशिवाय ती महाराष्ट्र राज्याची राजधानीही आहे.

खूप पूर्वी मुंबई हा सात बेटांचा समूह होता. पोर्तुगालच्या राजकन्येचे लग्न इंग्लंडच्या राजकुमाराशी झाले तेव्हा पोर्तुगीजांनी इंग्रजांना लग्नात आंदण म्हणून ती बेटे दिली. मुंबई हे उत्कृष्ट नैसर्गिक बंदरसुद्धा आहे त्यामुळे त्या बेटांचे महत्व ओळखून इंग्रजांनी त्यांचा विकास केला. मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी हिच्या नावावरून मुंबई हे ह्या शहराचे नाव पडले.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर असल्यामुळे येथे उद्योगधंद्यांची झपाट्याने वाढ झाली. लहान, मध्यम, मोठे आणि अतीमोठे असे सर्व उद्योग येथे आहेत. शिवाय राजधानीचे शहर असल्यामुळे राज्यशासनाची सर्व मुख्य कार्यालये आणि उच्च न्यायालयही ह्या ठिकाणी आहेत. मलबारहिल येथील वर्षा बंगल्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहातात.

नेपियन सी रोड, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, वरळी, पाली हिल, जुहू इत्यादी ठिकाणी मुंबईतील अतीश्रीमंत लोक राहातात. धारावी येथे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. मुंबई हे चित्रपटउद्योगाचे देशभरातील मोठे केंद्र असल्याने हिंदीतील सर्व चित्रपटतारे आणि तारका मुंबईतच राहातात.

मुंबईची लोकलसेवा ही मुंबईची जीवनरेखा आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. मुंबईची सर्व उपनगरे लोकल आणि बसने एकमेकांशी जोडलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे ऐतिहासिक, भव्य स्थानक मुंबईतच आहे. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अनेक विमाने जगभरात जात असतात. आता मुंबईत मेट्रो पण झाली आहे.

मुंबईत कष्ट करणारा उपाशी मरत नाही. त्यामुळे देशभरातून कष्टक-यांचे लोंढे मुंबईत येऊन आदळत असतात. अनधिकृत अतिक्रमणे, वाढत्या झोपडपट्ट्या, फेरीवाले, मैदानांचा आणि बगीचांचा अभाव, वाढती गर्दी, वाहतुक कोंडी, अस्वच्छता, प्रदूषण ह्या मुंबईच्या खूप मोठ्या समस्या आहेत. विद्यमान सरकारने त्याविषयी काहीतरी ठोस पावले उचलावीत आणि मुंबई सुंदर राखावी अशी तमाम मुंबईकरांची अपेक्षा आहे.

माझं शहर मुंबई निबंध – Mumbai Nibandh in Marathi Set 3

दिल्ली देशाची राजधानी असली तरी मुंबईला देशाची औद्योगिक राजधानी समजली जाते, कारण मुंबई या ठिकाणी देशातील कानाकोपऱ्यातून पोटभरण्यासाठी हजारो माणसं येतात आणि त्या सर्वांनाच कसलान् कसला रोजगार देण्याचं काम मुंबई करते.

मुंबईची आणखी एक खास ओळख आहे ती म्हणजे बॉलिवूड. अनेक चित्रपटांची निर्मिती या मुंबईमधून होते. अनेक कलाकार म्हणूनच मुंबईमध्ये येऊन आपलं नशीब आजमवत असतात.

मुंबई तसं पाहिलं तर एकच एक शहर नाही, ते सात बेटावर विस्तीर्ण असे पसरलेलं शहर आहे, ज्याला आपण अनेक शहराचं शहर म्हणू.

मुंबईत अनेक जाती-धर्माची, अनेक भाषा बोलणारी माणसं सापडतील, म्हणूनच त्याला मेट्रो पॉलिटन शहर म्हणतात. या ठिकाणी जसे श्रीमंतीचे प्रदर्शन पहायला मिळेल, तितकेच अमर्याद दारिद्र्य देखील पहायला मिळेल.

मुंबईमध्ये फेरफटका मारायचे म्हटले तर अनेक ठिकाणी आपल्याला इंग्रजीनी बांधकाम करून ठेवलेले कार्यालय दिसतील. दगडी बांधकामे दिसतील.

बेटावरच वसले असल्याने जागोजागी पाण्याच्या खाड्या आणि पुन्हा शहर, खाडी संपली की शहर दिसेल. त्यामुळे हे शहर समुदातच वसले आहे की काय असेही वाटते.

चित्रपट उद्योग जसा इथे तेजीत आहे. तसेच अनेक कारखाने पण इथे आहेत. सोबत गुन्हेगारी पण प्रचंड असल्याचे आढळेल, जितक्या चांगल्या गोष्टी इथे सापडतील. तितक्याच वाइट गोष्टी इथे सापडतील. काहीही असलं तरी मुंबई हे शहर म्हणूनच माझ्या आवडचं मुंबई हे शहर शहर आहे.

आमची राजधानी मुंबई निबंध – Mazi Mumbai Nibandh in Marathi Set 4

मी महाराष्ट्र राज्यात राहतो. मुंबई हे आमचे राजधानीचे शहर आहे. तसेच संपूर्ण भारताची ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. कारण येथील व्यापारात आणि भांडवल बाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते.

फार पूर्वी मुंबई म्हणजे सात बेटांचा छोटा समूह होता. या बेटांचे महत्त्व ओळखून इंग्रजांनी त्याचा विकास केला. “मुंबादेवी” ही मुंबईची ग्रामदेवता तिच्यावरूनच “मुंबई” हे नाव पडले. मुंबई हे बंदर असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी फारच सोयीचे आहे. त्यामुळेच येथे अनेक उद्योगधंद्यांची फार झपाट्याने वाढ झाली.

लहानात लहान उद्योगापासून मोठ्यात मोठ्या उद्योगापर्यंत सर्वप्रकारचे उद्योग याठिकाणी आहेत. तसेच हे राजधानीचे शहर असल्यामुळे सर्व विभागीय व मुख्य शासकीय कार्यालये याठिकाणी आहेत. भारतातील रोखे बाजाराचे प्रमुख केंद्र मुंबईत आहे. ‘बॉम्बे हाय’ येथून नैसर्गिक तेल व वायू समुद्रातून काढला जातो. मुंबईच्या तारापूर येथे अणुशक्ती केंद्र आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय मुंबई येथे आहे.

मुंबई हे महाराष्ट्रातील शिक्षणाचे एक प्रमुख केंद्र आहे. येथे सर्वप्रकारच्या विद्याशाखांमध्ये शिक्षण दिले जाते. उदा. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला इत्यादी. अनेक सामाजिक संस्था येथे कार्यरत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्य चळवळीचे मुंबई हे एक प्रमुख केंद्र होते. पु ल देशपांडे, पु. भा. भावे, बाबूराव पेंटरसारख्या मोठ्या लोकांची देणगी महाराष्ट्राला मुंबईकडूनच मिळाली. सचिन तेंडुलकरसारखा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू मुंबईचाच. सिनेउद्योगासाठी मुंबई संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. येथे बनणारे चित्रपट जगभरातील रसिकांना भुरळ घालतात.

मुंबईची सर्व उपनगरे एकमेकांशी लोकलने जोडलेली आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस हे अत्यंत देखणे व भव्य रेल्वे स्टेशन मुंबईलाच आहे. ‘सहारा’ या आतरराष्ट्रीय विमानतळावरून सर्व जगात विमाने ये-जा करतात.

काम शोधण्यासाठी मुंबईत गेलेला माणूस उपाशी कधीच राहत नाही. त्याला काम नक्कीच मिळते. परंतु त्यामुळे मुंबईची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढली. त्यासाठी जनता व सरकारने गुन्हेगारीचे उच्चाटन करण्याचा कसून प्रयत्न केला पाहिजे. समुद्राकाठी असल्याने येथील वातावरण दमट आहे.

काही असो माझे मात्र मुंबईवर फार प्रेम आहे.

मुंबई एक महानगर निबंध – Essay on Mumbai in Marathi Set 5

‘मुंबई नगरी बडी बांका’ असे मुंबईचे नाव अख्ख्या देशात गाजते आहे. मुंबईबाहेरच्या सगळ्याच लोकांना मुंबईबद्दल फार कुतुहल असते. तसे पाहिले तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथील व्यापारात आणि भांडवली बाजारात कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. त्याशिवाय ती महाराष्ट्र राज्याची राजधानीही आहे.

पण खूप खूप पूर्वी येथे कोळ्यांची वस्ती होती. हा केवळ सात बेटांचा एक समूह होता. तेथील मुंबादेवी ह्या ग्रामदेवतेमुळे मुंबई असे नाव ह्या बेटांना पडले. पोर्तुगालच्या राजकन्येचे लग्न इंग्लंडच्या राजकुमाराशी झाले तेव्हा पोर्तुगीजांनी इंग्रजांना लग्नात आंदण म्हणून ही बेटे दिली. मुंबई हे उत्कृष्ट नैसर्गिक बंदरसुद्धा आहे त्यामुळे त्या बेटांचे महत्व ओळखून इंग्रजांनी त्यांचा विकास केला. हे आंतरराष्ट्रीय बंदर असल्यामुळे येथे उद्योगधंद्यांची झपाट्याने वाढ झाली. लहान, मध्यम, मोठे आणि अत्यंत मोठे असे सर्व उद्योग येथे आहेत. शिवाय राजधानीचे शहर असल्यामुळे राज्यशासनाची सर्व मुख्य कार्यालये आणि उच्च न्यायालयही ह्या ठिकाणी आहेत.

मलबारहिल येथील वर्षा बंगल्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहातात. नेपियन सी रोड, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, वरळी, पाली हिल, जुहू इत्यादी ठिकाणी मुंबईतील अतीश्रीमंत लोक राहातात. धारावी येथे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. शिवाय मुंबई हे चित्रपटउद्योगाचे देशभरातील मोठे केंद्र असल्याने हिंदीतील सर्व चित्रपटतारे आणि तारका मुंबईतच राहातात.

मुंबईची लोकलसेवा ही मुंबईची जीवनरेखा आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. मुंबईची सर्व उपनगरे लोकल आणि बसने एकमेकांशी जोडलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे ऐतिहासिक, भव्य स्थानक मुंबईतच आहे. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अनेक विमाने जगभरात जात असतात. आता मुंबईत मेट्रो पणझाली आहे.

मुंबईत कष्ट करणारा उपाशी मरत नाही. त्यामुळे देशभरातून कष्टकयांचे लोंढे मुंबईत येऊन आदळत असतात. अनधिकृत अतिक्रमणे, वाढत्या झोपडपट्ट्या, फेरीवाले, मैदानांचा आणि बगीचांचा अभाव, वाढती गर्दी, वाहतुक कोंडी, अस्वच्छता, प्रदूषण ह्या मुंबईच्या खूप मोठ्या समस्या आहेत. विद्यमान सरकारने त्याविषयी काहीतरी ठोस पावले उचलावीत आणि मुंबई सुंदर राखावी अशी तमाम मुंबईकरांची अपेक्षा आहे.

पुढे वाचा:

FAQ: आमची मुंबई

प्रश्न १. मुंबई कशासाठी प्रसिद्ध आहे?

उत्तर- भारतातील सर्व शहरांमध्ये लक्षाधीश आणि अब्जाधीशांची संख्या सर्वाधिक आहे. एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि 19व्या आणि 20व्या शतकात डिझाइन केलेल्या व्हिक्टोरियन शहराचे वैशिष्ट्य.

प्रश्न २. मुंबई स्वप्ननगरी आहे का?

उत्तर- महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला “स्वप्नांचे शहर” किंवा “मायनगरी” असे म्हणतात. वर्षानुवर्षे हे विशेषण प्राप्त झाले आहे कारण ते राज्यांमधील भारतीय नागरिकांना अमर्याद संधी देते, तसेच परराज्यातील लोकांसाठी देखील.

अस्पृश्यता – समाजाला लागलेला एक कलंक मराठी निबंध | Asprushyata Ek Kalank In Marathi

अभयारण्याला भेट मराठी निबंध | Visit to the Sanctuary Marathi Essay

अंधविश्वास निबंध मराठी | Andhvishwas Essay in Marathi

साखरपुडा समारंभासाठी लागणारे साहित्य | साखरपुडा कसा करावा

लग्न ठरल्यानंतर करावयाची कामे | Lagna Tharlya Nantar Kay Karave

विवाह पद्धती बद्दल माहिती | Vivah Paddhati Marathi

हॉटेल वर निबंध मराठी

हॉकी वर मराठी निबंध | Essay on Hockey in Marathi

हे विश्वची माझे घर निबंध | Essay on He Vishwachi Maze Ghar

हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी | Hundabali Streechi Aatmkatha Marathi

Leave a Reply