बेशुद्धावस्था आणि कृत्रिम श्वासोच्छवास

बेशुद्ध होण्याची कारणे

उंचावरून पडून डोक्याला मार लागणे, एखादी जड वस्तू डोक्यावर पडणे, वाहनावरून पडून अपघात होणे या प्रकारांमध्ये मेंदूला कधी तात्पुरती तर कधी गंभीर इजा होऊ शकते. त्यामुळे व्यक्ती बेशुद्ध होते. तसेच गॅसने श्वास कोंडल्यामुळे सुद्धा कधीकधी बेशुद्धी येते. काही केसेस मध्ये कमी रक्तदाबाचा झटका, रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक कमी होणे ही सुद्धा बेशुद्ध होण्याची कारणे असतात. मोठ्या विद्युत प्रभाराचा विजेचा झटका लागल्यामुळेही माणूस बेशुद्ध होतो.

बेशुद्धावस्था आणि कृत्रिम श्वासोच्छवास

बेशुद्धावस्था दोन प्रकारची असते

१) पहिल्या प्रकारात रुग्णाची हृदयाची धडकन आणि श्वास दोन्ही चालू असतात. परंतु अचानक झालेल्या आघातामुळे माणूस बेशुद्ध असतो. नाकाकडे बोट आडवे धरल्यास श्वास चालू आहे हे समजते. आणि छातीवर डाव्या बाजूला कान लावल्यावर हृदयाचे ठोके ऐकू येतात.

बेशुद्धावस्थेत व्यक्तीची जीभ गुंडाळली जाऊन मागे पडते. त्यामुळे श्वसननलिका होते. म्हणून बेशुद्ध व्यक्तीला आधी एका कुशीवर झोपवावे. याला “रिकव्हरी पोझिशन” म्हणतात. या अवस्थेत गुंडाळलेली जीभ सरळ होऊन श्वसनमार्ग मोकळा होतो. त्यानंतर रुग्णाच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करावा.

कांदा, किंवा इतर उग्र वासाची वस्तू नाकाजवळ न्यावी. अशा वस्तूंच्या वासामुळे मेंदूतल्या पेशी कार्यान्वित होऊन शुद्ध येते. रुग्णाला कधीच बेशुद्धावस्थेत पाणी पाजू नये. ते पाणी सरळ फुप्फुसात जाऊन मृत्यूला कारणीभूत ठरते.

२) दुसऱ्या प्रकारात हृदयाचे ठोके तर चालू असतात परंतु श्वास थांबलेला असतो. गॅसमुळे किंवा इतर कारणांमुळे श्वास कोंडल्यामुळे श्वास थांबतो. अशा वेळी रुग्णाला जिवंत ठेवण्यासाठी कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा.

अ) तोंडावाटे : रुग्णाच्या ओठांवर स्वच्छ रुमाल ठेवावा. त्याचे नाक बोटांच्या चिमटीत दाबून बंद करावे. आपण जोरात श्वास घेऊन हवा तोंडात भरून घेऊन ती रुग्णाच्या तोंडात जोरात फुकावी. हे सतत करत राहावे.

ब) चेस्ट कम्प्रेशन : एका हाताच्या मुठीवर दुसरा हात ठेवून दोन्ही हात रुग्णाच्या छातीवर दोन फुप्फुसांच्या मध्यभागी ठेवावेत. आणि एकामागोमाग एक कम्प्रेशन्स द्यावेत. लक्षात ठेवा, हृदयावर दाब द्यायचा नसतो. तसेच, हे कम्प्रेशन मिनिटाला ८० ते ८५ लागतात. तेही न थांबता. म्हणून हात दुखू लागल्यास मदतनीस सोबत घ्यावा. आळीपाळीने कम्प्रेशन्स चालू ठेवावेत.

क) सिल्वेस्टर : रुग्ण छाती जमिनीवर टेकवून पडलेला असेल, व पाठीवरच्या जखमांमुळे त्याची पाठ जमिनीला टेकवणे शक्य नसेल तर कम्प्रेशन्स देता येत नाहीत. अशा वेळी रुग्णाचे दोन्ही हात त्याच्या कमरेवर ठेवावेत. (विठोबा ) दोन्ही कोपर हातात घेऊन वर खाली पंखांप्रमाणे हलवावेत. हे सतत करत राहावे. यामुळे फुप्फुसांचे आकुंचन प्रसरण होऊन श्वासोच्छवास होत राहतो. परंतु लक्षात ठेवा हि पद्धत अगदीच नाईलाज असताना वापरायची आहे.

कृत्रिम श्वासोच्छवास अधूनमधून तोंडावर पाणी मारणे, हृदयाचे ठोके तपासणे, चालूच ठेवावे. कधीकधी कृत्रिम श्वास देताना व्यक्ती आपोआप शुद्धीवर येते. परंतु तसे न झाल्यास रुग्णवाहिका बोलावून रुग्णास तडक हॉस्पिटल मध्ये न्यावे. परंतु रुग्णवाहिका येईपर्यंत श्वास देणे थांबवू नये.

अजून वाचा: कापणे आणि भाजणे यासाठी प्रथमोपचार

बर्ड फ्लू मराठी माहिती | Bird Flu Information in Marathi

पाठदुखी-कंबरदुखी संपूर्ण माहिती | कारणे, उपचार, लक्षणे, पथ्ये, आहार, घ्यावयाची काळजी

फॅट्स् म्हणजे काय?| फॅट्स्-चरबी वाढण्याची कारणे आणि उपाय

आपल्याला भूक का लागते? – भूक म्हणजे काय?

Leave a Reply