ऍलर्जीची सर्दी वर उपाय : ऍलर्जिक रिनायटिस : अर्थात ऍलर्जीची सर्दी ! हा त्रास मला गेली अनेक वर्षे आहे. बऱ्याच लोकांना असतो. यात वर्षाचे बारा महिने सर्दी असते. सकाळची सुरुवात शिंकांनी होते. उग्र मसाला, परफ्युम, साबण… कसल्याही वासाने दोन सेकंदात शिंका सुरु होतात.

आधी मला वाटायचं माझ्यात इम्युनिटी कमी आहे. मी ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु काही फायदा नाही. जराशी धूळ उडाली तरी सर्दीचा त्रास सुरु. परंतु इतर कोणताच आजार नाही. त्यामुळे हा इश्यू फक्त इम्युनीटीचा नक्कीच नव्हता.

ऍलर्जीची सर्दी वर उपाय , ऍलर्जिक रिनायटिस
ऍलर्जीची सर्दी वर उपाय, ऍलर्जिक रिनायटिस

मग अभ्यास केला. याला ऍलर्जिक रिनायटिस म्हणतात. ज्या गोष्टींची ऍलर्जी असते त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर दुसऱ्या सेकंदाला बॉडीमध्ये हिस्टॅमिन प्रोड्युस होते. आणि बॉडी ते पदार्थ बाहेर फेकण्यासाठी युद्धपातळीवर तयार होते.

अर्थात हे शरीराच्या भल्यासाठीच ! परंतु तरीही वाट लागते यार ! सिट्राझिन, लिव्होसिट्राझिन, अलेग्रा या अँटिहिस्टॅमिन टॅब्लेट्स आहेत. परंतु सतत टॅब्लेट्स घेणे हानिकारकच ! शिवाय हा आजार नाही. डिसऑर्डर आहे. त्यामुळे यावर कायमस्वरूपी मेडिसिन नाही.

ऍलर्जीची सर्दी वर उपाय

मग अभ्यासाअंती मला तोडगा सापडलाच ! ग्रीन टी ! अँटिऑक्सिडंट्स चा बाप… इम्युनिटी वाढवणारे आणि ऍलर्जिक रिएक्शन कमी करणारे कडू औषध ! याचे फायदे वाचून तर मी याची फॅन झालेय ! रोज दिवसातून दोन कप ग्रीन टी घेणं सुरु केलंय ! रोजचा दुधाचा चहा पूर्ण बंद केला.

फक्त दहा दिवसांतच असर जाणवला ! नुसताच ऍलर्जीचा त्रास कमी नाही झाला, तर ओव्हरऑल फ्रेशनेस मध्ये कमालीचा फरक पडलाय ! ग्रीन टी बॉडीतले टॉक्सिन्स नॅचरली एलिमिनेट करते. झिरो कॅलरी असल्यामुळे वेट कंट्रोल करते. आणि भरपूर अँटिऑक्सिडंट्स प्रोव्हाइड करते. और क्या चाहिये ? नक्की ट्राय करून पहा.

अजून वाचा: जेनेरिक औषधांबद्दल माहिती

बर्ड फ्लू मराठी माहिती | Bird Flu Information in Marathi

पाठदुखी-कंबरदुखी संपूर्ण माहिती | कारणे, उपचार, लक्षणे, पथ्ये, आहार, घ्यावयाची काळजी

फॅट्स् म्हणजे काय?| फॅट्स्-चरबी वाढण्याची कारणे आणि उपाय

आपल्याला भूक का लागते? – भूक म्हणजे काय?

Leave a Reply